मुंबई, १५ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : सुप्रिया गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांनी ट्वीट करून डेंग्यू झाल्याचे सांगितले. डॉक्टरांनी उपचार आणि विश्रांती घेण्याचा सल्ला दिल्यामुळे काही दिवस सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार आहे, असेही जयंत पाटील यांनी ट्वीट करून सांगितले. शक्य तितक्या लवकर दैनंदिन आणि पक्ष कामकाजाला सुरवात करेन, असा विश्वास जयंत पाटील यांनी ट्वीट करून व्यक्त केला.
काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डेंग्यू झाल्यामुळे उपचार आणि विश्रांती घेत असल्याचे जाहीर केले. सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार असल्याचे जाहीर केल्यानंतर काही दिवसांनी अजित पवार यांनी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर अजित पवार तातडीने दिल्लीला गेले. दिल्लीत अजित पवार, सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या तिघांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर अजित पवार पुन्हा घरी परतले. घरी परतल्यापासून अजित पवार परत एकदा सार्वजनिक जीवनापासून दूर राहून विश्रांती घेत आहेत.