पवारांची जात कोणती ?

मुंबई, १३ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : समाजमाध्यमांवर शरद पवार यांचा शाळेचा दाखला व्हायरल झाला आहे. यामुळे पवारांच्या जातीवरून चर्चेला उधाण आले आहे. पवारांच्या व्हायरल होत असलेल्या एका दाखल्यात ओबीसी असा उल्लेख आहे तर दुसऱ्या दाखल्यात पवार मराठा असल्याचा उल्लेख आहे. जरांगे यांच्या आंदोलनामुळे पवारांची जात चर्चेत आहे. व्हायरल झालेल्या एका दाखल्यावरून शरद पवार जातीने ओबीसी […]

पवारांची जात कोणती ?

मुंबई, १३ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : समाजमाध्यमांवर शरद पवार यांचा शाळेचा दाखला व्हायरल झाला आहे. यामुळे पवारांच्या जातीवरून चर्चेला उधाण आले आहे. पवारांच्या व्हायरल होत असलेल्या एका दाखल्यात ओबीसी असा उल्लेख आहे तर दुसऱ्या दाखल्यात पवार मराठा असल्याचा उल्लेख आहे. जरांगे यांच्या आंदोलनामुळे पवारांची जात चर्चेत आहे. व्हायरल झालेल्या एका दाखल्यावरून शरद पवार जातीने ओबीसी असल्याचा दावा करण्यात आला. या प्रकरणात नामदेव जाधव यांच्याविरोधात विकास लवांडे यांनी पुणे पोलिसात तक्रार केली आहे.

मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी महाराष्ट्रात चर्चेत असताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांची जात कुठली हा वाद पेटला आहे. राजमाता जिजाऊ यांचे वंशज नामदेव जाधव यांनी शरद पवार मराठा नसून ओबीसी असल्याचा दावा केला आहे. जाधव यांच्या दाव्याचा शरद पवार समर्थकांनी विरोध सुरू केला. पवार समर्थकांनी नामदेव जाधव यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार केली आहे.

पवारांनी ३१ मे १९५८ रोजी शाळा सोडल्याचे व्हायरल दाखल्यात दिसत आहे. हा दाखला ३ जून २०२२ रोजी काढण्यात आल्याचे दिसत आहे. पण पवारांचे निकटवर्तीय ते मराठा आहेत, असे सांगत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number