महाराष्ट्रातील दुष्काळसदृश परिस्थिती

मुंबई, ९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्रातील दुष्काळ स्थिती जाहीर केलेल्या ४० तालुक्यांच्या व्यतिरिक्त उर्वरित ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या ९५९ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. या महसुली मंडळातील दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या सर्व सवलती लागू होणार असल्याचे मदत, पुनवर्सन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी जाहीर केले. अकोला जिल्ह्यातील ७ […]

महाराष्ट्रातील दुष्काळसदृश परिस्थिती

मुंबई, ९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्रातील दुष्काळ स्थिती जाहीर केलेल्या ४० तालुक्यांच्या व्यतिरिक्त उर्वरित ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या ९५९ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. या महसुली मंडळातील दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या सर्व सवलती लागू होणार असल्याचे मदत, पुनवर्सन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी जाहीर केले.

अकोला जिल्ह्यातील ७ तालुक्यामधील ५० मंडळ, अमरावती जिल्ह्यातील १३ तालुक्यामधील ७३ मंडळ, बुलढाणा जिल्ह्यातील ११ तालुक्यामधील ७० मंडळ, वाशीम जिल्ह्यातील ६ तालुक्यातील ३१ मंडळ, यवतमाळ जिल्ह्यातील ५ तालुक्यामधील ९ मंडळ, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ७ तालुक्यामधील ५० मंडळ, बीड जिल्ह्यातील ८ तालुक्यातील ५२ मंडळ, हिंगोली जिल्ह्यातील ५ तालुक्यातील १३ मंडळ, जालना जिल्ह्यातील ३ तालुक्यामधील १७ मंडळ, लातूर जिल्ह्यातील ९ तालुक्यातील ४५ मंडळ, नांदेड जिल्ह्यातील ८ तालुक्यातील २३ मंडळ, धाराशीव जिल्ह्यातील ५ तालुक्यातील २८ मंडळ, परभणी जिल्ह्यातील ९ तालुक्यातील ३८ मंडळ, नागपूर जिल्ह्यातील ४ तालुक्यातील ५ मंडळ, वर्धा जिल्ह्यातील ४ तालुक्यातील ६ मंडळ, अहमदनगर जिल्ह्यातील १४ तालुक्यातील ९६ मंडळ, धुळे जिल्ह्यातील ३ तालुक्यातील २८ मंडळ, जळगाव जिल्ह्यातील १४ तालुक्यातील ६७ मंडळ, नंदुरबार जिल्ह्यातील ३ तालुक्यातील १३ मंडळ, नाशिक जिल्ह्यातील ८ तालुक्यातील ४६ मंडळ, कोल्हापूर जिल्ह्यातील ५ तालुक्यातील २० मंडळ, पुणे जिल्ह्यातील ६ तालुक्यातील ३१ मंडळ, सांगली जिल्ह्यातील ६ तालुक्यातील ३७ मंडळ, सातारा जिल्ह्यातील ८ तालुक्यामधील ६५ मंडळ, सोलापूर जिल्ह्यातील ७ तालुक्यामधील ४६ मंडळ असे एकूण १७८ तालुक्यातील ९५९ मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती म्हणून जाहीर करण्यात आले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number