‘महापूजेत राजकारण नको’

मुंबई, ९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूर येथे विठ्ठलाची महापूजा होणार आहे. या महापूजेत राजकारण नको, असे आवाहन मंदिर समितीच्यावतीने मराठा आंदोलकांना करण्यात आले आहे. राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असतील तर आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांनी आणि कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांनी महापूजा करायची अशी परंपरा आहे. या परंपरेनुसार उपमुख्यमंत्र्यांनी महापूजा करणे अपेक्षित आहे. पण मराठ्यांनी […]

‘महापूजेत राजकारण नको’

मुंबई, ९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूर येथे विठ्ठलाची महापूजा होणार आहे. या महापूजेत राजकारण नको, असे आवाहन मंदिर समितीच्यावतीने मराठा आंदोलकांना करण्यात आले आहे. राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असतील तर आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांनी आणि कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांनी महापूजा करायची अशी परंपरा आहे. या परंपरेनुसार उपमुख्यमंत्र्यांनी महापूजा करणे अपेक्षित आहे. पण मराठ्यांनी महापूजेत राजकारणी नको अशी भूमिका घेतली आहे. यानंतर ‘महापूजेत राजकारण आडवं आणू नका’, असे आवाहन मंदिर समितीने मराठा आंदोलकांना केले आहे. राज्य शासनाने अद्याप महापूजेसाठी सरकारकडून कोण जाणार हे जाहीर केलेले नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number