हुल्लडबाजीच्या विरोधात मुंबई विद्यापीठात मोर्चा

मुंबई, ७ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनाने सिनेट निवडणूक प्रकरणी घेतलेल्या निर्णयांचा निषेध करण्यासाठी मनसेने मोर्चा काढला आणि कुलगुरूंवर हल्ल्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी अभाविपने मनसेचा निषेध करणारा मोर्चा विद्यापीठाच्या आवारात काढला. या निमित्ताने सिनेट निवडणुकीचे राजकारण पुन्हा चर्चेत आले आहे. याआधी काही आठवड्यांपूर्वी रात्री उशिरा अधिसूचना काढणे, निवडणूक जवळ आली असताना मतदार […]

हुल्लडबाजीच्या विरोधात मुंबई विद्यापीठात मोर्चा

मुंबई, ७ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनाने सिनेट निवडणूक प्रकरणी घेतलेल्या निर्णयांचा निषेध करण्यासाठी मनसेने मोर्चा काढला आणि कुलगुरूंवर हल्ल्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी अभाविपने मनसेचा निषेध करणारा मोर्चा विद्यापीठाच्या आवारात काढला. या निमित्ताने सिनेट निवडणुकीचे राजकारण पुन्हा चर्चेत आले आहे. याआधी काही आठवड्यांपूर्वी रात्री उशिरा अधिसूचना काढणे, निवडणूक जवळ आली असताना मतदार यादीतील गोंधळाचे कारण देत संपूर्ण प्रक्रिया रद्द करणे. नव्याने मतदार नोंदणी सुरू करणे असे आदेश काढले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या निर्णयांना मनसेकडून आक्रमक पद्धतीने विरोध होत आहे. या विरोधाचा निषेध करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विद्यापीठात निषेध मोर्चा काढला. अभाविप प्रमाणेच मनसेच्या हुल्लडबाजीचा प्राध्यापकांनीही विरोध केला आहे.

अभाविपने काढला मनसेविरोधात मोर्चा
मनसेकडून कुलगुरू डॉ. कुलकर्णी यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न
मनसेच्या हुल्लडबाजीचा प्राध्यापकांनी केला निषेध

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number