पुणे, ३ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : ड्रग्ज माफिया ललित पाटीलसह १४ जणांवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी ड्रग्ज माफिया ललित पाटीलकडून आतापर्यंत आठ किलो सोनं जप्त केले. वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून आधी तीन किलो आणि आता पाच किलो सोनं जप्त करण्यात आले. ड्रग्ज विकून मिळालेल्या पैशांतून ललितने सोनं खरेदी केले होते. खरेदी केलेले सोनं ललितने वेगवेगळ्या ठिकाणी लपवले होते. पुणे पोलिसांनी सखोल चौकशी करून ललितकडून लपवलेल्या सोन्याची माहिती मिळवली. यानंतर पोलिसांनी पंचनामे करून सोन्याची जप्ती केली.