आमदार अपात्रताप्रकरणी नवं वेळापत्रक

मुंबई, १ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : आमदार अपात्रताप्रकरणी विधानसभाध्यक्षांचे कार्यालय नवे वेळापत्रक तयार करणार आहे. नव्या वेळापत्रकामुळे दिवाळीत सुनावणी होण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन असते. या कालावधीतही सुनावणी होण्याची शक्यता आहे. यामुळे विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांना अधिवेशनाचे कामकाज आणि सुनावणी अशा दोन्ही जबाबदाऱ्या एकाच कालावधीत हाताळाव्या लागण्याची शक्यता आहे. याआधी आमदार अपात्रताप्रकरणी विधानसभाध्यक्षांच्या कार्यालयाने […]

आमदार अपात्रताप्रकरणी नवं वेळापत्रक

मुंबई, १ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : आमदार अपात्रताप्रकरणी विधानसभाध्यक्षांचे कार्यालय नवे वेळापत्रक तयार करणार आहे. नव्या वेळापत्रकामुळे दिवाळीत सुनावणी होण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन असते. या कालावधीतही सुनावणी होण्याची शक्यता आहे. यामुळे विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांना अधिवेशनाचे कामकाज आणि सुनावणी अशा दोन्ही जबाबदाऱ्या एकाच कालावधीत हाताळाव्या लागण्याची शक्यता आहे. याआधी आमदार अपात्रताप्रकरणी विधानसभाध्यक्षांच्या कार्यालयाने सादर केलेली दोन वेळापत्रके सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. यानंतर सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने ३१ डिसेंबरपर्यंत निर्णय द्या अशा स्वरुपाचे मतप्रदर्शन केले. यावर विधानसभाध्यक्षांकडून ठोस उत्तर देण्यात आले नाही.

विधानसभाध्यक्ष हे एक घटनात्मक पद आहे. सर्वोच्च न्यायालयाने आजपर्यंत कधीही घटनात्मक पदावरील व्यक्तीला मुदत दिलेली नाही, ही बाब महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. या प्रकरणात पुढील सुनावणी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्रात घटनात्मक पेच निर्माण होत असल्याचे घटनातज्ज्ञ उज्ज्वल निकम म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number