ललित पाटीलला बुधवारी न्यायालयात हजर करणार

पुणे, ३१ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : ड्रग्ज तस्करी प्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या ललित पाटीलचा ताबा आता पुणे पोलिसांना मिळाला आहे. पुणे पोलीस ललितला बुधवारी न्यायालयात हजर करणार आहेत. चौकशीसाठी पुणे पोलीस ललित पाटीलच्या पोलीस कोठडीची मागणी करणार आहेत. ललित एका ड्रग तस्करीच्या प्रकरणात पुण्याच्या येरवडा तुरुंगात होता. तुरुंगात असताना ललित आजारी असल्याचे कारण देऊन […]

ललित पाटीलला बुधवारी न्यायालयात हजर करणार

पुणे, ३१ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : ड्रग्ज तस्करी प्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या ललित पाटीलचा ताबा आता पुणे पोलिसांना मिळाला आहे. पुणे पोलीस ललितला बुधवारी न्यायालयात हजर करणार आहेत. चौकशीसाठी पुणे पोलीस ललित पाटीलच्या पोलीस कोठडीची मागणी करणार आहेत. ललित एका ड्रग तस्करीच्या प्रकरणात पुण्याच्या येरवडा तुरुंगात होता. तुरुंगात असताना ललित आजारी असल्याचे कारण देऊन ससून रुग्णालयात दाखल झाला. यानंतर तो वारंवार आजारी असल्याचे कारण देऊन ससूनमधील मुक्काम वाढवू लागला. ससूनमधून ललित ड्रग तस्करी करत होता. काही आठवड्यांपूर्वी तो ससूनमधून एका हॉटेलमध्ये गेला आणि तिथून फरार झाला. मुंबई पोलिसांनी त्याला कर्नाटकमधून अटक करून मुंबईत आणले. आता ड्रग तस्करीच्या प्रकरणात चौकशी करण्यासाठी पुणे पोलिसांनी ललितचा ताबा घेतला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number