मराठा आरक्षण सध्या राज्यभरात चांगलेच पेटले आहे. त्यातच जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी अनेक ठिकाणी आंदोलने केली जात आहेत. परंतु मराठा आरक्षणाचा प्रश्न अजूनही सुटलेला नसल्याने जरांगेंचे आंदोलन अजूनही सुरूच आहे. त्यातच जरांगे पाटील यांनी सरकारबद्दल खळबळजनक वक्तव्य केले आहे.
काय म्हणाले जरांगे पाटील ?
जालना सरकारने घेतलेला एकही निर्णय आम्हाला मान्य नाही. अर्धवट प्रमाणपत्र मराठा समाज घेणार नाही. त्यामुळे रात्रीपर्यंत निर्णय घेतला नाही, तर मी जलत्याग करणार आहे. सरकारने विशेष अधिवेशन बोलावून यासंदर्भात निर्णय घ्यावा, असं मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. मराठ्यांच्या तरुणावर खोटे गुन्हे दाखल करु नका. महाराष्ट्र शांत आहे. सरकारचे लोक गोंधळ घालत आहेत. तरुणांवर गुन्हे दाखल झाले तर मी स्वत: बीडमध्ये जाऊन एसपी, जिल्हाधिकाऱ्यांसमोर जाऊन बसेन. त्यावेळी १० लाख किंवा ५ लाख मराठा समाज येईल हे सांगता येत नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.