मुंबई, ३१ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभरात पेटला आहे. मनोज जरंगे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी राज्यभरात सर्वत्र आंदोलने केली जात आहेत. तसेच, राजकीय वर्तुळातही याच मुद्द्यावरून चांगलाच भडका उडाला आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ?
मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी हे उद्धव ठाकरे आहेत. त्यांना मराठा आरक्षणावर बोलण्याचा अधिकार नाही. उद्धव ठाकरे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घणाघात केली आहे.