सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा संपूर्ण महाराष्ट्र्भर पेटला असताना आता जालन्यातही मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन चांगलेच पेटले आहे. या आंदोलनाला आता हिंसक वळण आले आहे. जालन्यातील घनसावंगी येथील पंचायत समिती कार्यालयामधील खोल्यांना आग लावली आहे. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घडलेल्या घटनेत आगीत कागदपत्रे पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. या घटनेने जिल्ह्यात […]
सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा संपूर्ण महाराष्ट्र्भर पेटला असताना आता जालन्यातही मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन चांगलेच पेटले आहे. या आंदोलनाला आता हिंसक वळण आले आहे. जालन्यातील घनसावंगी येथील पंचायत समिती कार्यालयामधील खोल्यांना आग लावली आहे. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घडलेल्या घटनेत आगीत कागदपत्रे पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. या घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.