मुख्यमंत्री – राज्यपाल बैठक

मुंबई, ३० ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. या भेटीत मराठा आरक्षणप्रश्नी सुरू असलेले आंदोलन, कायदा – सुव्यवस्था, हिंसेला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने केलेले उपाय या विषयांवर चर्चा झाली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. राज्यात ठिकठिकाणी जाळपोळीच्या घटना घडत आहेत. अनेक ठिकाणी […]

मुख्यमंत्री – राज्यपाल बैठक

मुंबई, ३० ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. या भेटीत मराठा आरक्षणप्रश्नी सुरू असलेले आंदोलन, कायदा – सुव्यवस्था, हिंसेला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने केलेले उपाय या विषयांवर चर्चा झाली.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. राज्यात ठिकठिकाणी जाळपोळीच्या घटना घडत आहेत. अनेक ठिकाणी सत्ताधारी लोकप्रतिनिधींना लक्ष्य करून हिंसा केली जात आहे. या घडामोडींची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेतली. मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यात राजभवन येथे सुमारे अर्धा तास चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर रवाना झाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number