‘वाझेमुळे उद्योग पळाले’

मुंबई, २८ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : सचिन वाझेमुळे महाराष्ट्रातील उद्योग पळाले असे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले. महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला जात आहेत, अशा स्वरुपाचा आरोप उद्धव गट आणि सुप्रिया सुळे गट वारंवार राज्य शासनावर करत असतो. या आरोपांवर प्रतिक्रिया देताना उदय सामंत यांनी वाझेचा मुद्दा उपस्थित केला. उद्योगपतींना धमकावून अथवा त्यांच्यावर दहशत बसवून खंडणी मागायची […]

‘वाझेमुळे उद्योग पळाले’

मुंबई, २८ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : सचिन वाझेमुळे महाराष्ट्रातील उद्योग पळाले असे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले. महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला जात आहेत, अशा स्वरुपाचा आरोप उद्धव गट आणि सुप्रिया सुळे गट वारंवार राज्य शासनावर करत असतो. या आरोपांवर प्रतिक्रिया देताना उदय सामंत यांनी वाझेचा मुद्दा उपस्थित केला.

उद्योगपतींना धमकावून अथवा त्यांच्यावर दहशत बसवून खंडणी मागायची हा उद्योग राज्यात काही काळ सुरू होता. हा उद्योग वाझेच्या माध्यमातून सुरू होता. राज्यातले उद्योगांना अनुकूल असलेले वातावरण बिघडवण्यासाठी हे प्रकार कारणीभूत ठरले होते. हीच बाब अधोरेखीत करत वाझेची आदित्य – उद्धव यांच्याकडून पाठराखण सुरू असल्याची टीका उदय सामंत यांनी केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number