शिंदे मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण करणार

मुंबई, २८ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. ते मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण करतील. त्यांच्याच नेतृत्वात आगामी निवडणुका लढवल्या जातील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. एखादा व्हिडीओ दाखवून कोणी मुख्यमंत्री म्हणून येतो का ? असा प्रतिप्रश्न करत फडणवीस यांनी मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेला पूर्णविराम लावला आहे. याआधी शुक्रवारी संध्याकाळी महाराष्ट्र भाजपाच्या ट्विटर हँडलवरून […]

शिंदे मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण करणार

मुंबई, २८ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. ते मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण करतील. त्यांच्याच नेतृत्वात आगामी निवडणुका लढवल्या जातील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. एखादा व्हिडीओ दाखवून कोणी मुख्यमंत्री म्हणून येतो का ? असा प्रतिप्रश्न करत फडणवीस यांनी मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेला पूर्णविराम लावला आहे. याआधी शुक्रवारी संध्याकाळी महाराष्ट्र भाजपाच्या ट्विटर हँडलवरून ‘मी पुन्हा येईन’ हा फडणवीस यांचा व्हिडीओ ट्वीट करण्यात आला होता. मराठा आंदोलन सुरू असताना ट्वीट झालेल्या या व्हिडीओमुळे राज्यात नेतृत्वबदल होणार असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. पण फडणवीस यांनी मुख्यमंत्री बदलणार नसल्याचे सांगत चर्चेला पूर्णविराम लावला.

देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यात परक
एकनाथ शिंदे आमचे मुख्यमंत्री आहेत. मी त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांच्या पाठीशी राहणार.
एखाद्याला यायचे असेल तर व्हिडीओ टाकून येतो का ?
एखाद्या व्हिडीओचा अर्थ लावणे चुकीचे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील
ते मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका होतील
ज्यांच्या नेतृत्वाखाली ३०५ खासदार निवडून येतात, त्यांनी ज्यांच्या नेतृत्वाखाली फक्त चार खासदार निवडून येतात, त्यांचा धसका घेतला हे बोलणं हास्यास्पद.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number