शरद पवारांचा आजचा सोलापूर दौरा रद्द

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा आजचा नियोजित सोलापूर दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा निरीक्षक शेखर माने यांनी ही माहिती दिली आहे. इंडिया आघाडीच्या कोअर कमिटीच्या बैठकीमुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी सोलापूर जिल्ह्यातील माढाच्या दौऱ्यावर आहेत. सकल मराठा समाजाने दौर्‍याला […]

शरद पवारांचा आजचा सोलापूर दौरा रद्द

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा आजचा नियोजित सोलापूर दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा निरीक्षक शेखर माने यांनी ही माहिती दिली आहे.

इंडिया आघाडीच्या कोअर कमिटीच्या बैठकीमुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी सोलापूर जिल्ह्यातील माढाच्या दौऱ्यावर आहेत. सकल मराठा समाजाने दौर्‍याला विरोध केला आहे. जिल्ह्यात येण्यापूर्वी आरक्षण द्या, अशी त्यांची मागणी आहे.

दरम्यान शरद पवार हे पंढरपूर येथे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघातील राजकीय स्थिती जाणून घेणार होते. त्यासाठी पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांना बोलवले होते. या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. शिवाय पंढरपूर शहरात वातावरण निर्मिती करण्यासाठी शरद पवारांच्या स्वागताचे ठिकठिकाणी मोठमोठे बॅनर लावण्यात आले होते, मात्र हा आजचा दौरा रद्द करून पुढे ढकलण्यात आला आहे.

शरद पवार यांच्या माढा दौऱ्याची तयारी अनेक दिवसांपासून सुरू होती. सोमवारच्या दौऱ्याची संपूर्ण तयारी देखील आयोजकांकडून पुर्ण करण्यात आली होती. मात्र शरद पवारांचा दौरा अचानक रद्द झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number