ललित पाटील प्रकरणी गौप्यस्फोट

मुंबई, २० ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ललित पाटील प्रकरणी मोठा गौप्यस्फोट केला. ललित पाटील याला अटक झाली. अटक झाली त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्याला नाशिक शिवसेनेचे शहर प्रमुख केले होते. पोलिसांनी ललितला अटक केल्यावर न्यायालयात पोलीस कोठडी मागितली. ती चौदा दिवसांसाठी मिळाली. तो लगेच ससूनमध्ये दाखल […]

ललित पाटील प्रकरणी गौप्यस्फोट

मुंबई, २० ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ललित पाटील प्रकरणी मोठा गौप्यस्फोट केला. ललित पाटील याला अटक झाली. अटक झाली त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्याला नाशिक शिवसेनेचे शहर प्रमुख केले होते. पोलिसांनी ललितला अटक केल्यावर न्यायालयात पोलीस कोठडी मागितली. ती चौदा दिवसांसाठी मिळाली. तो लगेच ससूनमध्ये दाखल झाला. पोलीस कोठडीच्या चौदा दिवसांत पोलीस चौकशी झाली नाही. पोलिसांनी ही माहिती न्यायालयात दिली नाही आणि पुन्हा कोठडी मागितली नाही. पोलिसांनी पकडलेल्या व्यक्तीची चौकशीच केली नाही. कोणी दबाव आणला ? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. आणखी बऱ्याच गोष्टी आहेत. पण आज सांगणार नाही, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number