मुंबई, १९ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत जनहिताचे आठ महत्त्वाचे निर्णय झाले.
१. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई मधून शासकीय बँकिंग व्यवहार करता येणार
२. महाप्रितमार्फत ठाण्यात समूह गृहनिर्माण प्रकल्प राबविणार. परवडणारी घरे मोठ्या प्रमाणावर उभारणार
३. राज्यातील सूतगिरण्या सुरळीतपणे चालवणार. पुढील पाच वर्षे कर्जावरील व्याज शासन भरणार
४. कोराडीत सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावरील वीज प्रकल्पास मान्यता
५. इमारत व बांधकाम कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभ गतीने मिळणार. कामगार नियमांत सुधारणा करणार
६. बार्टी, सारथी, महज्योती, अमृत या संस्थांच्या कार्यक्रमांत समानता आणण्यासाठी धोरण
७. राज्यात चार धर्मादाय सह आयुक्त पदांची निर्मिती करणार
८. अहमदनगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय