मुंबई, १७ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : बँकिंग नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेने दोन खासगी बँकांना दंड ठोठावला. आयसीआयसीआय बँकेला रिझर्व्ह बँकेने १२.१९ कोटी रुपयांचा दंड ठोठावला. कोटक महिंद्रा बँकेला रिझर्व्ह बँकेने ३.९५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला. याआधी रिझर्व्ह बँकेने युनियन बँक ऑफ इंडिया, आरबीएल बँक आणि बजाज फायनान्स लिमिटेड यांना दंड ठोठावला. बँकिंग नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. तसेच रिझर्व्ह बँकेने पेटीएम बँक आणि अण्णासाहेब मगर सहकारी बँक या दोन बँकांना दंड ठोठावला. केवायसी, सायबर सुरक्षा, यूपीआय यांच्याशी संबंधित नियमांचे उल्लंघन केले म्हणून ही कारवाई करण्यात आली.