अजित पवारांनी फेटाळले बोरवणकरांचे आरोप

मुंबई, १७ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : येरवाड्यामधील सरकारी भूखंड विकासाकरिता खासगी विकासकाला देण्याचा निर्णय त्यावेळच्या राज्य सरकारने घेतला होता. तो निर्णय मी घेतलेला नव्हता. माझ्यावर होत असलेल्या आरोपात तथ्य नाही, असे अजित पवार म्हणाले. निवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी केलेल्या आरोपांवर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. पुस्तक लिहित असताना […]

अजित पवारांनी फेटाळले बोरवणकरांचे आरोप

मुंबई, १७ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : येरवाड्यामधील सरकारी भूखंड विकासाकरिता खासगी विकासकाला देण्याचा निर्णय त्यावेळच्या राज्य सरकारने घेतला होता. तो निर्णय मी घेतलेला नव्हता. माझ्यावर होत असलेल्या आरोपात तथ्य नाही, असे अजित पवार म्हणाले. निवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी केलेल्या आरोपांवर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. पुस्तक लिहित असताना प्रसिद्धीसाठी काही खळबळजनक गोष्टी लिहिल्या की ते पुस्तक प्रकाशझोतात येते, तसा प्रयत्न यावेळी दिसून येतो, असा टोमणाही अजित पवार यांनी बोरवणकर यांना मारला.

येरवाडातील पोलिसांच्या जमिनीचा लिलाव करण्याचा आदेश पालकमंत्री अजित पवार यांनीच २०१० मध्ये आपल्याला दिला होता, असा थेट आरोप माजी पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी केला. त्यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत आपल्यावरील होणारे आरोप फेटाळून लावताना मी संबंधित प्रकरणी त्यावेळी बोरवणकर यांच्याशी चर्चा केली हे कबूल करतो, मात्र तो निर्णय घ्यायला मी कोणताही दबाव टाकला नाही. त्यांनी जागा देण्यास विरोध दर्शवल्यानंतर मी देखील पुन्हा त्यांना त्याविषयी त्यांना हटकले नाही, असे अजित पवार यांनी सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number