महादेव अॅप प्रकरणातील आरोपीला अटक

मुंबई, १७ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : महादेव अॅप प्रकरणातील प्रमुख आरोपी मृगांक मिश्राला अटक करण्यात आली. पोलिसांनी मिश्राला मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली. मुंबई पोलिसांनी मिश्राला राजस्थान पोलिसांकडे हस्तांतरित केले. राजस्थानमध्ये मृगांक मिश्रा विरोधात आर्थिक अफरातफर करण्यासाठी शेकडो संशयास्पद बँक खाती उघडण्याचा आरोप आहे. मिश्रा काही काळ दुबईत होता. त्याच्या विरोधात लूक आऊट नोटीस निघाली. […]

महादेव अॅप प्रकरणातील आरोपीला अटक

मुंबई, १७ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : महादेव अॅप प्रकरणातील प्रमुख आरोपी मृगांक मिश्राला अटक करण्यात आली. पोलिसांनी मिश्राला मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली. मुंबई पोलिसांनी मिश्राला राजस्थान पोलिसांकडे हस्तांतरित केले. राजस्थानमध्ये मृगांक मिश्रा विरोधात आर्थिक अफरातफर करण्यासाठी शेकडो संशयास्पद बँक खाती उघडण्याचा आरोप आहे. मिश्रा काही काळ दुबईत होता. त्याच्या विरोधात लूक आऊट नोटीस निघाली. यानंतर मायदेशी परतताच मिश्राला मुंबई पोलिसांनी पकडले आणि राजस्थान पोलिसांच्या ताब्यात दिले. मृगांक मिश्रा हा मूळचा मध्य प्रदेशमधील रतलामचा निवासी आहे. महादेव अॅपच्या माध्यमातून त्याने अल्पावधीत कोट्यवधींची कमाई केली होती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number