मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई, १५ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी: मध्यरेल्वेने अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घोषित केला आहे. मुंबईच्या उपनगरीय विभागांत पाचव्या आणि सहाव्या मार्गिकांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील अनेक लोकल रद्द करण्यात आल्या आहेत, तर काहींची वेळापत्रक बदलण्यात आले आहे. ठाणे-कल्याण दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गावर मध्यरात्री १ […]

मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई, १५ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी: मध्यरेल्वेने अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घोषित केला आहे. मुंबईच्या उपनगरीय विभागांत पाचव्या आणि सहाव्या मार्गिकांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील अनेक लोकल रद्द करण्यात आल्या आहेत, तर काहींची वेळापत्रक बदलण्यात आले आहे.

ठाणे-कल्याण दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गावर मध्यरात्री १ ते ४ पर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात आला असून रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. या कालावधीत अप आणि डाउन मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत. कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गावर धावणाऱ्या अप आणि डाउन मेल एक्स्प्रेस गाड्या अप आणि डाउन जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. यामुळे गाड्या स्थानकावर १० ते १५ मिनिटे उशिरा पोहोचणार आहेत.

चुनाभट्टी/वांद्रे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल करता सुटणारी हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४. ४३ वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव करता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात आली आहे.

पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द असेल. गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात आली आहे. ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला प्लॅटफॉर्म क्र. ८ दरम्यान विशेष रेल्वे चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number