मुंबई, १४ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी (ता. ५ ऑक्टो रोजी ) जाहीर सभा बोलावली आहे. या सभेत ताई गटाच्या पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी स्वतः शरद पवार लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन करतील. जाहीर सभा १५ ऑक्टोबर रविवारी ठाकरसी हाऊस येथे दुपारी ३.०० वाजता बोलवण्यात आली आहे. तर या सभेला सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, अमोल कोल्हे हे नेते उपस्थित राहणार आहेत. या सभेत येणाऱ्या आगामी लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.