मुंबई, १२ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : उद्धव गट आणि शिवसेना यांच्यात आमदारांच्या पात्रतेवरून सुरू असलेल्या वादाची सुनावणी विधान भवनात झाली. विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. आमदार अपात्रतेच्या या प्रकरणात पुढील सुनावणी शुक्रवार २० ऑक्टोबर २०२३ रोजी होणार आहे. गुरुवारच्या सुनावणीत उद्धव गटाने आमदार अपात्रतेप्रकरणी सर्व याचिकांची सुनावणी एकत्र घ्यावी असा युक्तिवाद केला. तर प्रत्येक याचिकेची सुनावणी ही स्वतंत्रपणे घ्यावी, असा युक्तिवाद एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून करण्यात आला.
‘विधानसभा अध्यक्ष वेळकाढूपणा करतायत’
संजय राऊतांच्या नार्वेकरांवर हल्लाबोल