मुंबई, १२ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : उद्धव गटाचा दसरा मेळावा मुंबईत दादर येथे शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि उद्धव गट या दोघांनी दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे याकरिता अर्ज केला होता. पण शिंदे गटाने अर्ज मागे घेतला. यामुळे उद्धव गटाला शिवाजी पार्क मैदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. मुंबई महापालिकेने गुरुवारी औपचारिक मंजुरी दिली. यामुळे उद्धव गटाला दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळणार हे निश्चित झाले आहे.