मुंबई, १० ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : हेमा उपाध्याय आणि वकील हरेश भंभानी हत्या प्रकरणातील दोषींना शिक्षा झाली आहे. मुंबईतील कलाकार हेमाचा पती चिंतन उपाध्याय याच्यासह तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात चिंतन तसेच विजय राजभर, प्रदीप राजभर आणि शिवकुमार राजभर दोषी आढळले आहेत. दिंडोशी सत्र न्यायाल्याने यांना शिक्षा सुनावली आहे. दोषींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी सरकारी पक्षाची होती. कलाकार हेमा उपाध्याय आणि वकील हरेश भंभानी यांची डिसेंबर २०१५ मध्ये हत्या झाली होती.