मुंबई, १० ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : शिंदे सरकारमध्ये सहभागी पक्षांचा विधीमंडळ समित्यांचा फॉर्म्युला ठरला. भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी पक्षामध्ये ५०:२५:२५ प्रमाणात समित्यांचे वाटप होणार आहे. आमदारांच्या संख्येनुसार विधानसभा व विधानपरिषद समित्यांचे वाटप होणार असे समजले आहे. महायुती समन्वय समितीच्या आजच्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. विधानसभा व विधानपरिषदेच्या एकूण २८ समित्यांवर आमदारांची नेमणूक होणार आहे. समित्यांच्या अध्यक्ष व सदस्य पदांची यादी समन्वय समिती विधीमंडळात देणार आहे. विधानसभा अध्यक्ष व विधानपरिषद उपसभापतींना महायुतीचे नेते भेटणार आहेत.