वडेट्टीवारांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस संभ्रमात

पुणे, १० ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : मी मागील सहा टर्मपासून राजकारणात आहे. राहुल गांधी उच्च शिक्षित आहेत. मात्र ते चांगले वक्ते नाहीत. आधी चांगला वक्ता होण्याची गरज आहे; असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. ते पुण्यात एमआयटी कॉलेजच्या विद्यार्थ्यांसमोर बोलत होते. विधानसभेतील विरोधी पक्षनेते असलेले वडेट्टीवार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. यावेळी वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे […]

वडेट्टीवारांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस संभ्रमात

पुणे, १० ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : मी मागील सहा टर्मपासून राजकारणात आहे. राहुल गांधी उच्च शिक्षित आहेत. मात्र ते चांगले वक्ते नाहीत. आधी चांगला वक्ता होण्याची गरज आहे; असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. ते पुण्यात एमआयटी कॉलेजच्या विद्यार्थ्यांसमोर बोलत होते. विधानसभेतील विरोधी पक्षनेते असलेले वडेट्टीवार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. यावेळी वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेस संभ्रमात पडल्याचे चित्र आहे.

काँग्रेसचे नेते असूनही वडेट्टीवार यांनी जाहीरपणे राहुल गांधी यांच्याविषयी मतप्रदर्शन केले. याआधी वडेट्टीवार यांनी राहुल गांधींमधील उणिवा या विषयावर कधीही वक्तव्य केले नव्हते. काही दिवसांपूर्वीच भाजपाच्या नितेश राणे यांनी वडेट्टीवार शिंदे सरकारचे मंत्री होऊ शकतात, असे भाकीत वर्तवले होते. हे भाकीत वर्तवून काही दिवस होत नाहीत तोच वडेट्टीवार यांनी राहुल गांधींमधील उणिवा या विषयावर जाहीर वक्तव्य केले. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number