‘…तर टोलनाके जाळून टाकू’

मुंबई, ९ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी: टोलदरवाढीवरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी ठाण्यातील आनंदनगर टोलनाका या ठिकाणी उपोषण पुकारले होते. मनसे अध्यक्षांनी भेट घेतल्यानंतर हे उपोषण मागे घेतले. सोमवारी पुन्हा एकदा राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले त्याचबरोबर टोलनाके जाळण्याचा इशारा देखील दिला. आपलं टोलचं आंदोलन २००९-१०च्या सुमारास […]

‘…तर टोलनाके जाळून टाकू’

मुंबई, ९ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी: टोलदरवाढीवरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी ठाण्यातील आनंदनगर टोलनाका या ठिकाणी उपोषण पुकारले होते. मनसे अध्यक्षांनी भेट घेतल्यानंतर हे उपोषण मागे घेतले. सोमवारी पुन्हा एकदा राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले त्याचबरोबर टोलनाके जाळण्याचा इशारा देखील दिला.

आपलं टोलचं आंदोलन २००९-१०च्या सुमारास सुरू झालं, हा टोलचा सगळा कॅशमधला पैसा जातो कुठे? याचं होतं काय? आणि त्याच त्याच कंपन्याना हे टोल मिळतात कसे? यानंतरही शहरातील रस्त्यांवर खड्डे पडणार असतील तर हे पैसे जातात कुठे असा प्रश्न पडतो असे राज ठाकरे म्हणाले.

त्यावेळेला काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना, भाजप काय म्हणाले हे मला दाखवायचं आहे असे म्हणत पत्रकार परिषदेतच राज ठाकरे यांनी राज्यातील सत्ताधारी आणि विरोधातील नेत्यांचे टोल संबंधीत जुने व्हिडिओ दाखवले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्धव ठाकरे यांच्या जुन्या क्लीप त्यांनी दाखवल्या.

व्हिडीओ क्लिप दाखवल्यानंतर राज ठाकरे म्हणाले की,

ही माणसं प्रत्येकवेळी टोलमुक्त महाराष्ट्राची घोषणा करतात, या सगळ्यांची सरकारे महाराष्ट्रात येऊ गेली पण एकही गोष्ट झाली नाही. राजकारणातील अनेक लोकांचं उदरनिर्वाहाचं साधण आहे, असा आरोपही राज ठाकरे यांनी केला.

तर टोल जाळून टाकू…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात टोलबंदी असल्याचे वक्तव्य केले होते. हाच व्हिडिओ दाखवत त्यांनी फडणवीस धादांत खोटे बोलत असल्याची टीका त्यांनी केली. तसेच टोलनाक्यावर यापुढे अडवलं तर टोल जाळून टाकू. असा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number