मुंबई, ७ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : ‘शिवसेना अमित शाहंनी नाही तर ईडी आणि सीबीआयने फोडली… महाराष्ट्रातलं सरकार ईडी आणि सीबीआयनं आणलं…’ असा गंभीर आरोप उद्ध गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. मागील एक वर्षापेक्षा जास्त काळापासून संजय राऊत हा आरोप करत आहेत. विशेष म्हणजे स्वतः संजय राऊत सध्या जामिनावर आहेत.
‘राऊत उत्तर देण्याच्या लायकीचे नाहीत’
संजय राऊत हे उत्तर देण्याच्या लायकीचे नाहीत. राऊत काहीही बोलतात असं टीका फडणवीसांनी केली. मंत्रीमंडळाचा लवकरचं विस्तार होणार आहे. त्याबाबत सध्या चर्चा सुरु आहे अशी माहिती फडणवीसांनी दिली.
संजय राऊतांचे आरोप
‘राज्यातील सरकारची नाडी दिल्ली सरकारकडे’
‘शिंदेंना मध्यरात्रीही दिल्लीला जावं लागतं’
‘फडणवीस मदारी, मुख्यमंत्री शिंदेंना नाचवतात’
‘फडणवीस डमरू वाजवतात, २ माकडं नाचतात’
आमदार संजय गायकवाडांचा राऊतांवर पलटवार
‘उद्धव गटाचे लेंगे आणि त्यांचे नाडे काँग्रेसच्या हातात’
नितेश राणेंचा संजय राऊतांवर पलटवार
‘संजय राऊत नेमके कोणाचे माकड ?’
‘उद्धव ठाकरेंचे की शरद पवारांचे ?’