शिवसेनेच्या आंदोलनानंतर प्रशासन नरमले

कल्याण डोंबिवली मध्ये विकास कामावरून राजकारण तापलेले असताना शुक्रवारी शिवसेनेचे पदाधिकारी त्याचप्रमाणे शहर प्रमुख राजेश मोरे यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. त्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना ४८ तासाचा मुदत दिली होती. खड्डे बुजवायला सुरुवात करा अन्यथा तुमच्या तोंडाला काळे फासल जाईल असा सज्जड दम दिला होता. हा इशारा दिल्यानंतर अगदी सहा तासातच रात्री […]

शिवसेनेच्या आंदोलनानंतर प्रशासन नरमले

कल्याण डोंबिवली मध्ये विकास कामावरून राजकारण तापलेले असताना शुक्रवारी शिवसेनेचे पदाधिकारी त्याचप्रमाणे शहर प्रमुख राजेश मोरे यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. त्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना ४८ तासाचा मुदत दिली होती. खड्डे बुजवायला सुरुवात करा अन्यथा तुमच्या तोंडाला काळे फासल जाईल असा सज्जड दम दिला होता. हा इशारा दिल्यानंतर अगदी सहा तासातच रात्री उशिरा दीड वाजता १६ डंपर गाड्या डोंबिवलीत आणल्या गेल्या आणि डोंबिवली शहरातील जे मुख्य रस्ते आहेत. जिथे खड्डे पडलेले आहेत त्या ठिकाणी धूळ साचलेली असून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत होते. अशा काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत त्या मुख्य रस्त्यांवर डांबरीकरण होताना दिसत आहे. असं मत शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे यांनी व्यक्त केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number