‘रुग्णमृत्यूचा आकडा अचानक वाढलेला नाही’

नागपूर, ५ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : शासकीय रुग्णालयातील रुग्ण मृत्यूबाबत राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी आढावा घेतला. नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील सरकारी रुग्णालयातून आकडेवारी मागवली. या आकडेवारीनुसार आरोग्य विषयक तक्रारींमुळे दररोज सरकारी रुग्णालयात सरासरी १४ ते १७ मृत्यू होतात. १. नागपूर मेयो आणि वैद्यकीय रुग्णालयदररोज रुग्ण मृत्यू : १७मासिक मृत्यू : ५३२ […]

‘रुग्णमृत्यूचा आकडा अचानक वाढलेला नाही’

नागपूर, ५ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : शासकीय रुग्णालयातील रुग्ण मृत्यूबाबत राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी आढावा घेतला. नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील सरकारी रुग्णालयातून आकडेवारी मागवली. या आकडेवारीनुसार आरोग्य विषयक तक्रारींमुळे दररोज सरकारी रुग्णालयात सरासरी १४ ते १७ मृत्यू होतात.

१. नागपूर मेयो आणि वैद्यकीय रुग्णालय
दररोज रुग्ण मृत्यू : १७
मासिक मृत्यू : ५३२

२. नांदेड शासकीय रुग्णालय
दररोज रुग्ण मृत्यू : १३
मासिक मृत्यू : ४०१

३. छत्रपती संभाजीनगर शासकीय रुग्णालय
दररोज रुग्ण मृत्यू : १४
मासिक मृत्यू : ४२६

आढावा घेतल्यानंतर समोर आलेल्या महत्त्वाच्या बाबी

  1. १. रुग्ण मृत्यूचा आकडा १४ ते १७ इतकाच

२. जनतेचा शासकीय आरोग्य व्यवस्थेवर विश्वास कायम

३. खासगी रुग्णालयातून अत्यवस्थ रुग्ण शासकीय रुग्णालयात पाठवले जातात

४. सुट्या जोडून आल्या की, शासकीय रुग्णालयात रीघ वाढते

भारती पवारांनी केली पाहणी

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवारांनी जिल्हा शासकीय रुग्णालयांची पाहणी केली. नांदेड दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर भारती पवारांकडून ही पाहणी करण्यात आली. आपत्कालीन यंत्रणा, औषधसाठा याबाबत त्यांनी माहिती घेतली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number