मुंबई, ३० सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : मुंबईत ईदच्या दिवशी एक धक्कादायक घटना घडली. ईद निमित्त काढण्यात आलेल्या जुलूसमध्ये महिला पोलिसाची छेड काढण्यात आली. ही घटना विक्रोळीत घडली. पार्कसाईट पोलीस ठाण्यात या प्रकरणात तक्रार दाखल झाली. पण कोणाला अटक झाली नाही. अखेर हिंदुत्ववादी संघटना आणि राजकीय पक्षांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याला घेराव घालून ठिय्या आंदोलन सुरू केले. छेड काढणाऱ्यावर कारवाई करा, अशी मागणी आंदोलकांनी केली. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फूटेज तपासून छेड काढणाऱ्याचा शोध सुरू केला आहे.