हार्बर मार्गावर ३८ तासांचा ब्लॉक

मुंबई, २९ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : मालवाहतुकीसाठी दोन स्वतंत्र रेल्वे रुळ तयार करण्याचे काम हार्बर मार्गावर सुरू आहे. याच कामाचा भाग म्हणून हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर बेलापूर ते पनवेल दरम्यान ३८ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. जाणाऱ्या आणि येणाऱ्या मार्गावर हा ब्लॉक घेतला जाईल. या मेगाब्लॉकची सुरुवात शनिवार ३० सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी अकरा […]

हार्बर मार्गावर ३८ तासांचा ब्लॉक

मुंबई, २९ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : मालवाहतुकीसाठी दोन स्वतंत्र रेल्वे रुळ तयार करण्याचे काम हार्बर मार्गावर सुरू आहे. याच कामाचा भाग म्हणून हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर बेलापूर ते पनवेल दरम्यान ३८ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. जाणाऱ्या आणि येणाऱ्या मार्गावर हा ब्लॉक घेतला जाईल. या मेगाब्लॉकची सुरुवात शनिवार ३० सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून होईल. मेगाब्लॉक सोमवार २ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी एक वाजता संपणार आहे.

शेवटची गाडी – शनिवार ३० सप्टेंबर २०२३

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ते पनवेल – रात्री ०९.०२ वाजता सीएसएमटी मुंबईतून सुटेल
पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई – रात्री १०.३५ वाजता पनवेलहून सुटेल
पनवेल ते ठाणे – रात्री ०९.२० वाजता पनवेलहून सुटेल
ठाणे ते पनवेल – रात्री ०९.३६ वाजता ठाण्यातून सुटेल

पहिली गाडी – सोमवार २ ऑक्टोबर २०२३

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ते पनवेल – दुपारी १२.०८ वाजता सीएसएमटी मुंबईतून सुटेल
पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई – दुपारी १.३७ वाजता पनवेलहून सुटेल
पनवेल ते ठाणे – दुपारी ०२.०१ वाजता पनवेलहून सुटेल
ठाणे ते पनवेल – दुपारी १.२४ वाजता ठाण्याहून सुटेल

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number