पुणे, २५ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे. अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात पक्षात दोन स्वतंत्र गट निर्माण झाले आहेत. अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे सरकारला पाठिंबा दिला आहे. तर सुप्रिया सुळे गट सरकारच्या विरोधात आहे. दोन्ही गटांमधील संघर्ष निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणात निवडणूक आयोग जो […]
पुणे, २५ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे. अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात पक्षात दोन स्वतंत्र गट निर्माण झाले आहेत. अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे सरकारला पाठिंबा दिला आहे. तर सुप्रिया सुळे गट सरकारच्या विरोधात आहे.
दोन्ही गटांमधील संघर्ष निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणात निवडणूक आयोग जो निर्णय देईल तो मान्य करणार, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.