छत्रपती संभाजीनगर, १४ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा छत्रपती संभाजीनगर दौरा रद्द झाला. ते १७ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येणार होते. पण काही सरकारी कार्यक्रमांमुळे अमित शाह यांचा दौरा रद्द झाला आहे. यासंदर्भात अधिक माहिती देण्यात आलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहार, महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर आणि तेलंगणा या तीन राज्यांमध्ये एकाच दिवशी जाण्याचे नियोजन आधी करण्यात आले होते. पण आगामी विधानसभा निवडणुकांसाठी दिल्लीत बैठका सुरू झाल्या आहेत. यामुळे छत्रपती संभाजीनगरचा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण लवकरच छत्रपती संभाजीनगरचा दौरा करणार असल्याचे संकेत अमित शाह यांच्याकडून देण्यात आल्याचे समजते.