‘इंग्लंडमध्ये उद्धव यांच्या अनेक मालमत्ता’

जळगाव, १२ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : इंग्लंडमध्ये उद्धव यांच्या अनेक मालमत्ता आहेत. जी २० परिषदेच्या निमित्ताने इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना भेटलो, त्यावेळी त्यांनीच या विषयात सुतोवाच केले, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते पाचोरा येथे ‘शासन आपल्या दारी’ या सरकारी कार्यक्रमात बोलत होते. ऋषी सुनक मला म्हणाले, हाऊ इज ‘यूटी’ मी म्हटले व्हाय ? […]

‘इंग्लंडमध्ये उद्धव यांच्या अनेक मालमत्ता’

जळगाव, १२ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : इंग्लंडमध्ये उद्धव यांच्या अनेक मालमत्ता आहेत. जी २० परिषदेच्या निमित्ताने इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना भेटलो, त्यावेळी त्यांनीच या विषयात सुतोवाच केले, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते पाचोरा येथे ‘शासन आपल्या दारी’ या सरकारी कार्यक्रमात बोलत होते.

ऋषी सुनक मला म्हणाले, हाऊ इज ‘यूटी’ मी म्हटले व्हाय ? त्यांनी सांगितले, दरवर्षी लंडनला येतात तेथे मोठ्या प्रॉपर्ट्या घेतात, मोकळी हवा खातात. तुम्ही लंडनला या मी तुम्हाला सर्व माहिती देतो…. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. सत्ता गेली असली तरी हे वास्तव स्वीकारणे उद्धव यांना जमलेले नाही. यामुळे ते वारंवार वाटेल ते बोलत आहेत. पण त्यांनी बोलताना भान राखावे. आम्हाला बोलण्याची वेळ येऊ देऊ नये; अन्यथा त्यांना ‘पाटणकर’ काढा घ्यावा लागेल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number