‘उत्तर नव्हे उत्तरदायित्व सभा’

कोल्हापूर, ९ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : ताई गटाचे खासदार शरद पवार यांची कोल्हापूर जिल्ह्यात निर्धार सभा झाली. या सभेला काही दिवस उलटत नाहीत तोच कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार यांनी सभेचे आयोजन केले आहे. अजित पवारांची सभा रविवारी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार यांची सभा तपोवन मैदानावर संध्याकाळी चार वाजता होणार आहे. या […]

‘उत्तर नव्हे उत्तरदायित्व सभा’

कोल्हापूर, ९ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : ताई गटाचे खासदार शरद पवार यांची कोल्हापूर जिल्ह्यात निर्धार सभा झाली. या सभेला काही दिवस उलटत नाहीत तोच कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार यांनी सभेचे आयोजन केले आहे. अजित पवारांची सभा रविवारी आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार यांची सभा तपोवन मैदानावर संध्याकाळी चार वाजता होणार आहे. या सभेला ५० हजारांपेक्षा जास्त उपस्थिती असेल असे अजित पवार यांच्या समर्थकांनी सांगितले.

ताई गट आणि दादा गट असे झाल्यानंतर शरद पवार यांनी कोल्हापूरमध्ये निर्धार सभा घेतली. या सभेत पवारांनी अजित पवार, हसन मुश्रीफ आणि केंद्र सरकारवर टीका केली. या सभेला उत्तर म्हणून सभा घेत आहात का, अशा स्वरुपाचा प्रश्न पत्रकारांनी अजित पवार यांना विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना कोल्हापूरमध्ये उत्तर सभा नाही तर उत्तरदायित्व सभा आहे असे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी सांगितले. कोणत्या जबाबदाऱ्या समर्थपणे हाताळत आहे आणि हाताळणार आहे याची माहिती देण्यासाठीच उत्तरदायित्व सभा घेत असल्याचे संकेत अजित पवार यांनी दिले. पत्रकारांना उत्तर देण्याच्या निमित्ताने अजित पवार यांनी शरद पवार यांनाच गुगली टाकली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number