पुणे, ९ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे जिल्ह्यात अजित पवार शक्तीप्रदर्शन करणार आहेत. याआधी ते शिष्यवृत्ती प्रदान आणि शिक्षक गौरव सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाईल तसेच शिक्षकांचा गौरव केला जाईल. शनिवारी पुण्यात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि अजित पवार एका मंचावर असतील. तसेच अजित पवार पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. जिल्हा प्रशासन, पुणे पालिका प्रशासन यांच्यासोबत बैठका करून अजित पवार विकासकामांचा आढावा घेणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातील कार्यक्रम झाल्यानंतर रविवारी कोल्हापूर येथे सभेसाठी जाणार आहेत.