आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना दिलासा

मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाकडून रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध नोंदवलेले दोन्ही एफआयआर रद्द करण्यात आले आहेत. एक पुण्यात, तर दुसरा मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्य गुप्तचर विभाग प्रमुख या नात्याने विरोधी नेत्यांचे फोन कॉल्स बेकायदेशीरपणे रेकॉर्ड केल्याचं हे […]

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना दिलासा

मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाकडून रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध नोंदवलेले दोन्ही एफआयआर रद्द करण्यात आले आहेत. एक पुण्यात, तर दुसरा मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्य गुप्तचर विभाग प्रमुख या नात्याने विरोधी नेत्यांचे फोन कॉल्स बेकायदेशीरपणे रेकॉर्ड केल्याचं हे प्रकरण आहे.

त्यानंतर महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असताना गुन्हे नोंदवण्यात आले होते. पुण्यात काँग्रेस नेते नाना पटोले यांचे फोन कॉल रेकॉर्ड केल्याप्रकरणी तर मुंबईत संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे फोन रेकॉर्ड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुणे प्रकरणात फिर्यादीद्वारे क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला होता. तर दुसरीकडे, कुलाबा प्रकरणी शुक्ला यांच्यावर खटला चालवण्यास मंजुरी देण्यास राज्य सरकारने नकार दिला होता.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number