माणगाव : उत्तराखंड येथे जमीन खरेदी करून देण्याचा बनाव रचून करण्यात आलेल्या फसवणुकीचा पर्दाफाश माणगाव पोलिसांनी केला आहे. माणगावमधील रहिवासी रमेश मोरे यांना उत्तराखंड येथे जमीन खरेदी करून देण्याच्या बहाण्याने फोन करून व प्रत्यक्ष भेटून उत्तराखंड येथे बोलावण्यात आले. व्यवहारासाठी जमिनीची खोटी कागदपत्रे तयार करून एक कोटी २४ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी माणगाव पोलिसांनी तपास केला. पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली. आरोपींकडून पोलिसांनी मोठी रोख रक्कम जप्त केली आहे. पोलिसांच्या कारवाईचे कौतुक होत आहे.