जळगावमध्ये पाऊस

जळगाव, ७ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : जळगाव शहरासह पाचोरा, भडगाव तालुक्यासह इतर भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला आहे. गेल्या दीड महिन्यापासून जळगाव जिल्ह्यात पावसाने दडी मारली होती. मात्र, मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे काही प्रमाणात का होईना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तर, गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाअभावी तापमान वाढल्याने उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले […]

जळगावमध्ये पाऊस

जळगाव, ७ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : जळगाव शहरासह पाचोरा, भडगाव तालुक्यासह इतर भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला आहे. गेल्या दीड महिन्यापासून जळगाव जिल्ह्यात पावसाने दडी मारली होती. मात्र, मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे काही प्रमाणात का होईना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तर, गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाअभावी तापमान वाढल्याने उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले होते. मात्र, जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number