मुंबई, ६ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत सहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
बुधवार ०६ सप्टेंबर २०२३ रोजी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने घेतले सहा महत्त्वाचे निर्णय
१. मेट्रो कारशेडसाठी मोघरपाडा ठाणे येथील जागा एमएमआरडीएला हस्तांतरीत
२. मुंबईत जानेवारीत आंतरराष्ट्रीय महोत्सव
३. राज्यात सायबर सुरक्षेसाठी ८३७ कोटींचा प्रकल्प
४. आर्थिक अडचणीतील सहकारी साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकेकडून शासन हमीवर कर्ज उपलब्ध करणार. एनसीडीसीपेक्षा कमी व्याजदरात कर्ज
५. केंद्राच्या विविध कंपन्यांना मुद्रांक शुल्कात संपूर्ण सूट
६. मध्य नागपूरमधील झोपडपट्टीतील घरांसाठी मुद्रांक शुल्कात कपात