प्रशिक्षणार्थी हवाई सुंदरीचा मुंबईत मृत्यू

मुंबई, ४ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : मुंबईत पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका प्रशिक्षणार्थी हवाई सुंदरीचा मृतदेह आढळला. ती २५ वर्षांची होती. मृतावस्थेत आढळलेल्या प्रशिक्षणार्थी हवाई सुंदरीचे नाव रुपल ओग्रे असे होते. रुपलच्या मृत्यूप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. रुपल मूळची छत्तीसगडची होती. ती नोकरीच्या निमित्ताने मुंबईत वास्तव्यास होती. संपर्क होत नसल्यामुळे रुपलला ओळखणारे काही जण […]

प्रशिक्षणार्थी हवाई सुंदरीचा मुंबईत मृत्यू

मुंबई, ४ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : मुंबईत पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका प्रशिक्षणार्थी हवाई सुंदरीचा मृतदेह आढळला. ती २५ वर्षांची होती. मृतावस्थेत आढळलेल्या प्रशिक्षणार्थी हवाई सुंदरीचे नाव रुपल ओग्रे असे होते. रुपलच्या मृत्यूप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

रुपल मूळची छत्तीसगडची होती. ती नोकरीच्या निमित्ताने मुंबईत वास्तव्यास होती. संपर्क होत नसल्यामुळे रुपलला ओळखणारे काही जण रविवारी घरी गेले, त्यावेळी दारावर कुलुप लावलेले दिसले. हा प्रकार बघून रुपलच्या नातलगांना संशय आला. अखेर पोलिसांना बोलावून कुलुप तोडण्यात आले. घरात प्रवेश केल्यावर एका खोलीत रुपल रक्ताच्या थारोळ्यात आढळली. पोलिसांनी रुपलला तातडीने रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासणी करून रुपलचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

रुपलच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी सोसायटीच्या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फूटेज तपासण्यास सुरुवात केली. ही तपासणी केल्यानंतर पोलिसांनी सोसायटीत सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या विक्रम अटवाल याला अटक केली. विक्रमच्या पत्नीचा शोध सुरू आहे.

वाईट नजरेने का बघतो ?

विक्रम वारंवार आपल्याकडे बघतो आणि त्याचा हेतू वाईट आहे असे जाणवल्यामुळे रुपलने एकदा त्याला जाब विचारला. यानंतर विक्रमने रुपलचा गळा चिरून तिची हत्या केली. या प्रकरणी सीसीटीव्ही फूटेज तपासून पोलिसांनी विक्रमला अटक केली आहे. पुढील पोलीस कारवाई सुरू आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number