जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
महागाईविरोधात आता शिवसेना आक्रमक झाली आहे. पेट्रोल, डिझेलच्या सतत वाढणाऱ्या दरवाढीचा निषेध करण्यासाठी भाजपविरोधात शिवसेना महामोर्चा काढणार आहे.
या मोर्चाचं नेतृत्त्व शिवसेनेच्या महिला आघाडीकडे असणार आहे.
शिवसेना भवनात आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी शिवसेना महिला आघाडीची बैठक झाली. नवरात्रीदरम्यान शिवसेना हा मोर्चा काढणार आहे.