सेल्फीमुळे पुन्हा गेले दोन बळी

वसई,२९ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : आजकालच्या तरुणाईमध्ये सेल्फी बद्दल अधिकचे आकर्षण असलेलं आपण बघतो.सेल्फी म्हणजे अनेकांच्या जीवनातील अविभाज्य भाग झालेली आहे. मात्र सेल्फी काढण्याच्या नादात अनेकांनी आपले प्राण गमावल्याचेही आपण अनेक वेळा पहिले आहे. अश्यातच वसई किल्ला समुद्रकिनार्‍यावर सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात मुलगा पाण्यात पडला आणि त्याला वाचवायला गेलेले त्याचे वडीलही पाण्यात बुडाले. रविवारी संध्याकाळी ही […]

सेल्फीमुळे पुन्हा गेले दोन बळी

वसई,२९ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : आजकालच्या तरुणाईमध्ये सेल्फी बद्दल अधिकचे आकर्षण असलेलं आपण बघतो.सेल्फी म्हणजे अनेकांच्या जीवनातील अविभाज्य भाग झालेली आहे. मात्र सेल्फी काढण्याच्या नादात अनेकांनी आपले प्राण गमावल्याचेही आपण अनेक वेळा पहिले आहे.

अश्यातच वसई किल्ला समुद्रकिनार्‍यावर सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात मुलगा पाण्यात पडला आणि त्याला वाचवायला गेलेले त्याचे वडीलही पाण्यात बुडाले. रविवारी संध्याकाळी ही दुर्दैवी घटना घडली. वसई पोलीस बुडालेल्या पिता-पुत्रांचा शोध घेत आहेत.

पूजा संपल्यावर निर्माल्य समुद्रात टाकण्यासाठी शैलेंद्र मोरे मुलगा घेऊन दुचाकीने वसई किल्ल्याजवळील समुद्रात गेेले होते. निर्माल्य टाकल्यानंतर देवेंद्रे जेटीवरून सेल्फी काढत होता. त्यावेळी त्याचा तोल जाऊन तो पाण्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी धावत जाऊन त्याच्या वडिलांनी पाण्यात उडी मारली. मात्र ते देखील बुडाले. एका प्रत्यक्षदर्शीने हा प्रकार पाहिला आणि पोलिसांना कळवले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number