गणेश उत्सवासावात येणार विघ्नं

मुंबई २९ ऑगस्ट २०२३,प्रतिनिधी : गणेश उत्सवासाठी गणेशभक्त मोठ्या प्रमाणात उत्साही आहेत. जल्लोषाच्या वातावरणात बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरु झालेली आहे. मात्र बाप्पाच्या आगमनात विघ्न येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई महानगरपालिकेकडून १३ उड्डाणपूल हे धोकादायक ठरवण्यात आलेला आहे. १५ ऑगस्टपासून गणपती बाप्पाचे आगमन सुरू झालेले आहे. सर्व गणेश मंडळ आपल्या लाडक्या बापाला वाजत गाजत मंडळामध्ये […]

गणेश उत्सवासावात येणार विघ्नं

मुंबई २९ ऑगस्ट २०२३,प्रतिनिधी : गणेश उत्सवासाठी गणेशभक्त मोठ्या प्रमाणात उत्साही आहेत. जल्लोषाच्या वातावरणात बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरु झालेली आहे. मात्र बाप्पाच्या आगमनात विघ्न येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई महानगरपालिकेकडून १३ उड्डाणपूल हे धोकादायक ठरवण्यात आलेला आहे. १५ ऑगस्टपासून गणपती बाप्पाचे आगमन सुरू झालेले आहे. सर्व गणेश मंडळ आपल्या लाडक्या बापाला वाजत गाजत मंडळामध्ये घेऊन जात आहे, मिरवणूक काढत आहेत.

या मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होतं आहे. त्यामुळे नागरिकांनी तसेच कार्यकर्त्यांनी उड्डाणपुलावरती जास्त वेळ थांबू नये असं, आव्हानही महानगरपालिकेकडून मंडळांना करण्यात आलेलं आहे. या संदर्भात दादर टिळक रेल्वे ओव्हर ब्रीझ वरून आढावा घेतला आहे, आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांनी.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number