अजित पवारांचे विरोधकांना प्रत्युत्तर

मुंबई, २८ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी  : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याच्या दौऱ्यावर आले आहेत. पुण्यात विविध कार्यक्रमांना ते हजेरी लावणार आहेत. काही वेळा आधी अजित पवार यांच्या हस्ते १०६ फुटी ध्वजाचा लोकार्पण झाले. यावेळी राष्ट्रवादीचे तटस्थ आमदार चेतन तुपे हेदेखील अजित पवार यांच्यासोबत उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. भाजपसोबत जाण्याचा […]

अजित पवारांचे विरोधकांना प्रत्युत्तर

मुंबई, २८ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी  : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याच्या दौऱ्यावर आले आहेत. पुण्यात विविध कार्यक्रमांना ते हजेरी लावणार आहेत. काही वेळा आधी अजित पवार यांच्या हस्ते १०६ फुटी ध्वजाचा लोकार्पण झाले. यावेळी राष्ट्रवादीचे तटस्थ आमदार चेतन तुपे हेदेखील अजित पवार यांच्यासोबत उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. भाजपसोबत जाण्याचा आपला निर्णय योग्य होता हे लोकांना पटवून देऊ आणि टीका करणाऱ्यांना उत्तर देऊ, असे अजित पवार यावेळी म्हणाले. तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि ग्रामीण भागातील समस्या सोडवण्यासाठीही उपाययाजना करणार असल्याची ग्वाही अजित पवार यांनी दिली.

लोक आमच्यावर टीका टिपण्णी करत आहेत. पण मी त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र कामातून आम्हाला दाखवून द्यायचे आहे की, आमचा निर्णय योग्यच होता. येत्या काळात हे दाखवून देऊ. उद्याचे भविष्य तरुणांच्या हातात आहे. त्यामुळे त्यांना आतापासूनच घडवण्याचे काम आपण करूया. महापालिका निवडणुका लागल्या नाहीत. सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असल्यामुळे निवडणुका प्रलंबित आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. मी कामाचा माणूस आहे. कामातून लोकांना उत्तर देणार आहे. सध्या वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असते. ती सोडवण्यासाठीही उपायोजना करणे गरजेचे आहे, असेही अजित पवार म्हणाले.

पुणे आणि पिंपरी आणि ग्रामीणच्या समस्या सोडवन्यासाठी दर आठवड्याला बैठक घेणार आहे. अधिकाऱ्यांना सध्या कुणाला विचारण्याची गरज नसणार आहे.विकासाची कामे झालीचे पाहिजे. अधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक कुणी चुका केल्या तर त्यांना दुसरीकडे पाठवण्यात येईल. कुणाची गय केली जाणार नाही, असा दमही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. झोपडपट्टी विरहित शहर करण्याचे काम आम्ही करत आहोत. पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे. राज्यात चांगले काम करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. काम करताना जातीय सलोखा राखण्याचे काम करत आहोत. अल्पसंख्याक समाजाला असुरक्षित वाटणार नाही, याचीही काळजी घेतोय, असे अजित पवार म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number