भाजप नेते आशिष शेलार यांचा उद्धवना टोला

मुंबई, २८ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी :  भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. काल हिंगोलीच्या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघाती टीका केली होती. त्याला आता भाजप नेत्यांकडून प्रत्युत्तर दिले जात शेलार यांनीही उद्धव ठाकरेंवर तोंडसुख घेतले आहे. ‘आजकाल उद्धव ठाकरेंच्या सभा म्हणजे पूर्वीच्या […]

भाजप नेते आशिष शेलार यांचा उद्धवना टोला

मुंबई, २८ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी :  भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. काल हिंगोलीच्या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघाती टीका केली होती. त्याला आता भाजप नेत्यांकडून प्रत्युत्तर दिले जात शेलार यांनीही उद्धव ठाकरेंवर तोंडसुख घेतले आहे. ‘आजकाल उद्धव ठाकरेंच्या सभा म्हणजे पूर्वीच्या काळात जे गावात येऊन महिला रडायच्या ते म्हणजे उद्धव ठाकरे. रडके उद्धव ठाकरे. यांना स्वतः चे विचार नाही, धोरण नाही. त्यामुळे हा त्यांचा पक्ष विचार धोरण सोडून बोलतो, आमची भाजपची संस्कृती अशी नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मर्यादेत राहावे,’ अशी टीका शेलार यांनी केले.

उद्धव ठाकरे यांची अवस्था शोले मधल्या जेलरसारखी झाली आहे. आधे इधर, आधे उधर आणि हे कडक जेलर. आम्हाला घर कोंबडा बोलायचे नाही, आमची संस्कृती तशी नाही. पण मर्यादेत राहवे, असा कडक इशारा आशिष शेलार यांनी दिला. इंडियाच्या बैठकीबद्दल शेलार म्हणाले की, ‘हे इंडिया वगैरे काही नाही घमंडीय आघाडी आहे. हे जरे सत्तेत आले, तर फक्त परिवारासोबत उडणारे फूल पाखरु आहेत,’ अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. ‘राज्याचे उपमुख्यमंत्री मेट्रोसाठी प्रोजेक्ट घेऊन आले आहेत. मग तुमच्या पोटात का दुखत आहे? उद्भव ठाकरे कधीही ACच्या बाहेर पडले नाहीत, ते काय शेतकऱ्याच्या मुद्यावर बोलणार? असा सवाल शेलार यांनी विचारला.

संजय राऊत यांचे विधान आणि लिखाण म्हणजे गांजा आणि चिलीम ओढून लिहिणारे आहेत. न्यायालयातील दहीहंडीची लढाई आम्ही लढलो आणि जिंकलो. शिंदे सरकारने लढाई लढली आणि आता प्रो गोविंदा होत आहे त्यामुळे स्टुलावर चढून फोडणार आहेत” अशी टीका आशिष शेलार यांनी केली. “वरळीत यावर्षीसुद्धा आम्ही दहीहंडी भरवणार. भ्रष्टाचाराच्या जमापुंजीतून मातोश्री २ बांधले आणि आता उरलेल्या पैशातून उद्धवजी चंद्रावर मातोश्री ३ बांधणार,
आमच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांचा सन्मान होता. पण आता इंडिया आघाडीत त्यांना पाय धरावे लागत आहेत. स्वतःच्या पदाच्या लालसेपोटी किती पायघड्या घालतात,’ अशी टीका आमदार आशिष शेलार यांनी केली. चांद्रयान 3 च्या यशाबद्दल तुम्ही शुभेच्छा दिल्या नाहीत. चंद्रावरच्या घराबाबत बोलत असाल, तर तुमच्यावर मुंबईकरांचा विश्वास नाही. आता चंद्रावर मातोश्री 3 बांधायचा, तर उद्धव ठाकरे यांचा विचार नाही ना,’ असे आशिष शेलार म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number