डिसेंबर २०२३ पर्यंत महामार्गावरील दोन्ही लेन पूर्ण करणार

रायगड,२६ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी : मुंबई – गोवा महामार्गावरील पनवेल ते कासू आणि कासू ते इंदापूर या दोन टप्प्यातील ८४ किलोमीटरचा रस्ता पूर्ण क्षमतेने तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यासाठी नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा व मशिनरीचा वापर होत आहे, त्यामुळे सिंगल लेन वरील काम पूर्ण होत आहे. १० सप्टे़बर पासून ही लेन वाहतूकीस पूर्ण क्षमतेने […]

डिसेंबर २०२३ पर्यंत महामार्गावरील दोन्ही लेन  पूर्ण करणार

रायगड,२६ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी : मुंबई – गोवा महामार्गावरील पनवेल ते कासू आणि कासू ते इंदापूर या दोन टप्प्यातील ८४ किलोमीटरचा रस्ता पूर्ण क्षमतेने तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यासाठी नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा व मशिनरीचा वापर होत आहे, त्यामुळे सिंगल लेन वरील काम पूर्ण होत आहे. १० सप्टे़बर पासून ही लेन वाहतूकीस पूर्ण क्षमतेने सुरू होईल असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज व्यक्त केला.

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज मुंबई ते गोवा या महामार्गाचच्या कामाची पाहणी केली. आजच्या दौऱ्यात त्यांनी पनवेल ते वाकण फाटा नागोठाणे पर्यंतच्या कामाची पाहणी केली. पहिल्या टप्प्यातील पळस्पे फाटा तसेच जिते तर कासू ते इंदापूर या दुसऱ्या टप्प्यातील पांडापूर येथील व नागोठाणे येथील कामाची पाहणी केली यावेळी अत्याधुनिक मशिनरी मागवण्यात आल्या आहेत. त्याची सविस्तर माहिती उपस्थित अधिकार्‍याकडून घेतली. मुंबई गोवा पाहणी दौऱ्याच्या निमित्ताने पांडापूर व नागोठणे येथे संवाद साधताना ते बोलत होते.

यावेळी बोलताना मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग वरील कासू पासून पुढील कामाची गती वाढविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) चे अधिकारी आणि ठेकेदारांना आदेश दिले आहेत. या टप्प्यातील ७ कि.मी चा रस्ता थोडा किचकट आहे. स्थिती पाहून नवीन तंत्राचा वापर केला जात आहे. खोलवर सिमे़ंट काँक्रेटचा वापर, अवजड वाहतुकीमुळे रस्ता खराब होऊ नये यासाठी रस्ता बनवताना २० टनी रोलरचा वापर केला जणार आहे. यासोबतच आधुनिक मशीन उपलब्ध करण्यात आले असून पा़ंडापूर येथे त्याची पाहणी केली.

महामार्गाची तातडीने कामे होण्यासाठी वाहतुकीचा अडथळा येऊ नये यासाठी पोलीस विभागांचे सहाय्य घेण्याबाबत सूचना दिल्या. याबाबत त्यांनी पोलीस अधिक्षक सोमनाथ घागरे यांच्याशी चर्चा केली. हा मार्ग लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने युद्धपातळीवर प्रयत्न करण्याचे निर्देश मंत्री चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिले.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number