पूर्ववैमनस्यातून पुण्यात हत्या

पुणे, १७ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : पु्ण्यात मंगला चित्रपटगृहासमोर बुधवारी मध्यरात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास २६ वर्षांच्या तरुणाची हत्या झाली. नितीन मोहन म्हस्के (वय २६) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. नितीनच्या हत्येची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने पोलिसांनी मारेकऱ्याचा शोध सुरू केला आहे. शिवाजीनगर पोलीस तपास करत आहेत. नितीन चित्रपट बघण्यासाठी […]

पूर्ववैमनस्यातून पुण्यात हत्या

पुणे, १७ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : पु्ण्यात मंगला चित्रपटगृहासमोर बुधवारी मध्यरात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास २६ वर्षांच्या तरुणाची हत्या झाली. नितीन मोहन म्हस्के (वय २६) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. नितीनच्या हत्येची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने पोलिसांनी मारेकऱ्याचा शोध सुरू केला आहे. शिवाजीनगर पोलीस तपास करत आहेत.

नितीन चित्रपट बघण्यासाठी मंगला चित्रपटगृह येथे गेला होता, तिथून बाहेर पडत असताना त्याची हत्या झाली. ही हत्या पूर्ववैमनस्यातून झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नितीन चित्रपटगृहातून बाहेर पडत होता त्यावेळी एक टोळके कोयता, तलवार अशी धारदार शस्त्रे आणि मोठे दगड हाती घेऊन वेगाने पुढे आले. त्यांनी नितीनवर हल्ला केला आणि त्याची हत्या केली. सीसीटीव्ही फूटेज तपासून पोलिसांनी सागर उर्फ येल्ल्या आणि त्याचे साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नितीन आणि सीसीटीव्हीत दिसलेले मारेकरी यांच्यात वाद झाला होता. या वादाचे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले होते. त्यावेळी पोलिसांनी कारवाई केली असती तर कदाचित नितीनने प्राण गमावले नसते, असे त्याच्या वडिलांनी सांगितले. सीसीटीव्हीत दिसत असलेल्या मारेकऱ्यांना अटक करावी. तोपर्यंत नितीनचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्याच्या नातलगांनी केली. पोलिसांनी नितीनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number